शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पर्यावरणप्रेमींचा विक्रमउदंड

By admin | Updated: December 22, 2014 01:21 IST

प्रतिसाद : विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधता गाडीचा चार दिवस नाशिकरोडला मुक्काम

नाशिक : रेल्वे गाडीत साकारलेली जैवसृष्टी पाहण्यासाठी नाशिककरांनी विक्रमी गर्दीची नोंद केली. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झालेल्या या ‘विज्ञान एक्स्प्रेस’ला पहिल्याच दिवशी सुमारे साडेआठ हजार पर्यावरणप्रेमींनी भेट दिली. राज्यात इतका उदंड प्रतिसाद इतर कोणत्याही शहरात मिळाला नसल्याने चार दिवसांत गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या जैवविविधतेची महती सांगणारी एक्स्प्रेस सध्या महराष्ट्राच्या रेल्वे रुळावरून धावत आहे. नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी अमरावती, कराड, पुणे या शहरात विज्ञान एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. या शहरांमध्ये इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या दिवशी १८ शाळा, ७७५ विद्यार्थी, ५६ शिक्षक, ४७० नर्सरीतील विद्यार्थी, ६७९० नागरिक आणि इतर अशा एकूण ८७४० जणांनी प्रदर्शन पाहिले.सकाळी मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते फित कापून या विज्ञान एक्स्प्रेसचा स्वागत करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतभर ही रेल्वेगाडी प्रवास करणार आहे. विज्ञानाची कामगिरी लोकांपर्यंत पोहचावी या हेतुने सुरू करण्यात आलेल्या या गाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या गाडीचे व्यवस्थापक राघव पंड्या यांनी सांगितले. सदर प्रदर्शन विनामूल्य असून सव्वाकोटी पर्यावरणप्रेमींनी प्रदर्शनाची पाहणी केली आहे. (प्रतिनिधी)