शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

वीस कोटींची विक्रमी वसुली लोकअदालत : राज्यात सर्वाधिक ४६ हजार प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:14 IST

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्टÑीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली.

ठळक मुद्दे१ लाख ८३ हजार २३ प्रकरणे न्यायालयात वीस कोटी ५२ लाख रुपयांची विक्रमी वसुली

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्टÑीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिसºयांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. दावापूर्व व प्रलंबित दाखल एकूण १ लाख ८३ हजार २३ प्रकरणे न्यायालयात होती. एकूण वीस कोटी ५२ लाख ४० हजार ८१४ रुपयांची विक्रमी वसुली झाली. जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते राष्टÑीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. प्रलंबित प्रकरणांपैकी ७ हजार ९९८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १ हजार ९८९ प्रकरणे निकाली काढली गेली. तसेच एक लाख ८३ हजार २३ दावापूर्व प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती, त्यापैकी ४४ हजार १५० प्रकरणांचा निपटारा झाला. एकूण ४६ हजार १३९ प्रकरणे निकाली निघाली. दावादाखल प्रकरणांमध्ये एकूण रक्कम दहा कोटी ९८ लाख ४८ हजार १६३ रुपये इतकी वसुली झाली. यामध्ये मोटार अपघात प्रकरणांमध्ये सुमारे ३ कोटी ९३ लाख ९१ हजार ३२५ तर धनादेश न वटल्याप्रकरणी ४ कोटी ४२ लाख ५५ हजार २० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ४ हजार ६३७ फौजदारी गुन्ह्यांपैकी ११८ प्रकरणांचा निपटारा होऊन ६ लाख ९५ हजार ५५० रुपयांच्या दंडाची तडजोड रक्कम वसूल केली. वाहतुकीसंदर्भात एकूण ८ हजार ४६१ दावे निकाली काढण्यात येऊन १६ लाख ७३ हजार ८०० रुपयांची दंड वसूल केला. बॅँकेच्या वसुली प्रकरणांशी संबंधित एक हजार २१९ पूर्व दावे दाखल होऊन २४८ दावे निकाली निघाले व १ कोटी ७५लाख ३९ हजार ८०७ रुपयांची तडजोडीची रक्कम वसूल झाली तसेच बॅँक वसुलीच्या ५५ प्रलंबित दाव्यांपैकी १० दावे निकाली निघाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीरकुमार बुक्के यांनी दिली.