नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून, या संधीच्या सूचना उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांना करण्यात आल्या आहेत. मंडळाने पुनर्रचना केलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ११ वीसाठी चालू शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून सुरू झाली आहे. तर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करून दिली आहे. मंडळाने पुनर्रचित केलेल्या अभ्यासक्रमानुसार बारावीची प्रथम परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०१८ मध्ये आयोजित केली जाणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या २० विषयांचे आणि जनरल फाउंडेशन कोर्सच्या पायाभूत अभ्यासक्रमाची मूल्यामापन योजना म्हणजेच प्रश्नपत्रिका आराखडे, घटकानुसार गुणविभागणी आदि माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बारावी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना
By admin | Updated: March 20, 2017 01:06 IST