शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांत टळली, आता पदवीधरसाठी अर्ज

By admin | Updated: January 16, 2017 01:41 IST

भाजप करणार शक्तिप्रदर्शन : सुधीर तांबे करणार उद्या अर्ज दाखल

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी भारतीय जनता पार्टीचे डॉ. प्रशांत पाटील आणि तिसऱ्या आघाडीचे उमेदवार राजू देसले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेषत: भाजपाने अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यावेळी भाजपाचे अनेक नेते आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र अजून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. संक्रांत टाळून उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात असले तरी उमेदवारांकडून याचा इन्कार करण्यात आला. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख मंगळवार, दि. १७ अशी आहे. भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाने जोरसार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. नाशिकरोड शिखरेवाडी येथील मैदानातून त्यांच्या रॅलीस प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता शिखरेवाडीतून निघालेला मोर्चा तासभराने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दाखल होणार आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या आघाडीचे राजू देसले हे गेल्या शुक्रवारीच अर्ज दाखल करणार होते. परंतु दिल्लीहून ए.बी. अर्ज मिळण्यास विलंब झाल्याने ते आता सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्यासोबत जे. पी. गावित, राज्य सहसचिव सुभाष लांडे, स्मिता पानसरे, प्रा. के. एन. अहिरे, सुनील मालुसरे, अ‍ॅड. मनीष बस्ते तसेच कामगार संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर कॉँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाप्रमाणेच कॉँग्रेसकडूनही शक्तिप्रदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)