शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांसाठी भाडेदराबाबत पुनर्विचार

By admin | Updated: July 28, 2016 01:43 IST

हॉकर्स झोन : शहर फेरीवाला समितीची बैठक

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात हॉकर्स झोनची अंमलबजावणी महापालिका महासभेचा ठराव प्राप्त होताच तातडीने सुरू करण्याची आणि फेरीवाल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाडेदराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हॉकर्स झोनच्या आराखड्याला महासभेने मंजुरी दिली असून, ठराव प्राप्त होताच सोडत पद्धतीने फेरीवाल्यांना जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाडेदराबाबतही चर्चा करण्यात आली. हॉकर्स युनियनने सदर भाडेदर कमी करण्यासंबंधी पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथे आकारण्यात येणाऱ्या भाडेदराच्या निम्मे दर नाशिकमध्ये आकारण्यात येणार आहेत, परंतु दराबाबत पुनर्विचार करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय फेरीवाल्यांचे प्रबोधन करण्यात येण्याबरोबरच काही भागातील भाजीविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी जागांचा शोध घेण्यात येणार आहे. हॉकर्स झोनची अंमलबजावणी करताना प्रथम नो हॉकर्स झोनमधील व्यावसायिकांना हटवत त्यांना नजीकच्या हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. बैठकीत सण-उत्सव या काळातील बाजारव्यवस्था, फूडप्लाझा यावरही चर्चा झाली, तसेच नेहरू उद्यानासमोरील जागेबाबत पोलीस विभागाने घेतलेल्या हरकतींविषयी दखल घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे, विभागीय अधिकारी यांच्यासह शहर फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)