शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आकृतिबंधास मान्यता

By admin | Updated: July 24, 2016 21:29 IST

चांदवड : नगरपरिषदेला ३९, तर कळवणसह सहा नगरपंचायतींसाठी २९ पदे भरणार

कळवण : राज्य शासनाने राज्यातील १०१ तालुकास्तरीय ग्रामपंचायतींचे नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये रूपांतर करण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला; मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती न केल्याने या नगरपंचायती व नगरपरिषदा असून नसल्यासारख्याच असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले असल्याने राज्यातील १०१ नगरपंचायती व नगरपरिषदांच्या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिली असून, येत्या महिनाभरात ही पदे भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कळवणसह सहा नगरपंचायतींसाठी २९, तर चांदवड नगरपरिषदेसाठी ३९ पदे भरण्यात येणार आहेत. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने सर्वत्र नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून, राज्यातील हे प्रमाण ४८ टक्के एवढे असल्याने तालुका मुख्यालयी वाढणारे नागरीकरण व त्या प्रमाणात नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यात तेथील ग्रामपंचायतींना अडचणी आणि मर्यादा येत असल्याने तालुका मुख्यालयाची सुनियोजितपणे मांडणी करण्यासाठी नगररचना योजना शासनाने लागू करून ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने राज्यात १०१ नगरपंचायती व नगरपरिषदा स्थापन झाल्या आहेत.नगरपंचायती व नगरपरिषदा स्थापन होऊन तब्बल १८ महिन्यांचा कालावधी लोटला गेला. पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन पहिले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष विराजमान झाले तरीसुद्धा मुख्याधिकाऱ्यासह प्रमुख कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला नसल्याने सर्वच नगरपंचायती व नगरपरिषदा यांच्यात शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात होती. नगरपंचायती व नगरपरिषदा यांच्या आस्थापनेवरील पदनिर्मितीचे अधिकार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या संचालकांना असल्याने त्यांनी आस्थापनेवरील पदांचा आकृतिबंध निर्माण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केल्याने नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिल्याने कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.नगरपंचायत व नगरपरिषद यांच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली यांची टक्केवारी कमीतकमी ९० असेल अशाच नगरपंचायती व नगरपरिषदांना वेतन व नियमित निवृत्तिवेतनासाठी १०० टक्के सहायक अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये पदे निर्माण करणे व पदांचा आकृतिबंध सुधारित करणे यास शासनाची मान्यता घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिली असून, वित्त विभागाने अग्निशमन विभागाशी संबंधित पदांचा विचार न करता इतर पदांसाठी सहायक अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींना १८ पदे, ५००१ ते १०००० लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींना २० पदे, १०००१ ते २५००० लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींना २९ पदे व २५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सात नगरपरिषदांना शासनाच्या धोरणानुसार ३९ पदे भरण्याच्या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरिता वार्षिक आवर्ती सहायक अनुदान मंजूर करण्यात आले आहे.नगरपंचायती व नगरपरिषदा यांच्यामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे ही ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत व नगरपरिषदांमध्ये रूपांतर करण्याबाबत प्राथमिक अधिसूचनेपूर्वी ग्रामपंचायतींमध्ये नियमित स्वरूपात कार्यरत असलेल्या तसेच विभागीय क्षेत्रातील नगरपंचायत, नगरपरिषदांमध्ये मंजूर आकृतिबंधापेक्षा जास्त कार्यरत असलेल्या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समावेशाने किंवा नगरपंचायत व नगरपरिषदांमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी नेमणुकीने पदे भरण्याचे शासनाचे धोरण असून, कार्यवाही करूनही पदे रिक्त राहिल्यास उर्वरित पदे सरळ भरतीने भरण्याचे शासनाने निश्चित केले आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करायच्या सूचना शासनाने केलेल्या असल्याने येत्या महिनाभरात राज्यातील नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींना कर्मचारी मिळणार आहेत. (वार्ताहर)