शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्रीसदो झ्र गोंदेदरम्यानच्या सहापदरी महामार्गास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:49 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग ते गोंदे यादरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी निकालात निघणार आहे तसेच नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

ठळक मुद्देघोटी : नाशिकझ्र मुबंई प्रवासाचा कालावधी होणार कमी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते गोंदेदरम्यानच्या चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग सहा पदरी करण्याच्या कामाला शनिवारी (दी.२१) सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ॲथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग ते गोंदे यादरम्यान वाहतुकीची होणारी कोंडी निकालात निघणार आहे तसेच नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.पिंप्रीसदो शिवारातून समृद्धी महामार्ग जात आहे. सध्या पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यान चार पदरी महामार्ग आहे. मुंबईहून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे साहजिकच वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याने प्रवाशांना इच्छुक स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. यातूनच प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. याची दखल घेत पिंप्री सदो ते गोंदे या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.अखेर केंद्राच्या परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यानचा महामार्गाच्या सहा पदरीकरणास मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे मुख्य जनरल मॅनेजर आशिष असाटी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले आहे. वडपे ते गोंदेदरम्यान सुमारे ९० किलोमीटरचा महामार्ग असून, त्यापैकी पिंप्रीसदो ते गोंदे हा २० वीस किलोमीटरचा चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार आहे.याकामी सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंप्रीसदो ते गोंदे यादरम्यान सहापदरी महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघणार असून, नाशिकझ्र मुंबई प्रवासाचा कालावधी निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग