शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दळवट येथे रु ग्णालयास मान्यता

By admin | Updated: October 31, 2016 01:28 IST

दळवट येथे रु ग्णालयास मान्यता

 कळवण : तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासीबांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाने मान्यता दिली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारत बाांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दळवट, बापखेडा, जिरवाडे, शेपूपाडा, कुमसाडी, धनोली, भांडणे, शिवभांडणे, वेरुळे, अंबापूर, शिंगाशी, वीरशेत, मागीलदार, चाफापाडा, ततांनी, शृंगारवाडी, दरेगाव, भाकुर्डे, कोसुर्डे, जामले (हा ) आदि भागांतील आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्या दळवट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत आहे. या भागातील आरोग्य विषयक प्रश्न आणि आरोग्य विभागाकडून दिली जाणारी सेवाबाबत या भागात गैरसोय होती. आरोग्य सेवा संचालनालयाने दळवट येथील ग्रामीण रु ग्णालयास व मुख्य इमारत बाधकामाच्या १३ कोटी ४६ लाख ५ हजार २०० रुपयांच्या रकमेच्या ंअंदाजपत्रक व नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दळवट येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०१३ -१४च्या दरसूचीवर आधारित आहे. अंदाजपत्रकातील ५ टक्के पाणीपुरवठा व मलनिस्सारण, ५ टक्के अंतर्गत जलविद्युतीकरण, ६ टक्के बाह्य जलविद्युतीकरण, ४ टक्के आकस्मित खर्च याप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ कोटी ६९ लक्ष ५४ हजार एवढ्या रकमेच्या अदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी, जागेची उपलब्धता, योग्यताबाबत आरोग्य विभागाने पाठपुरावा करावा, अशा अटी व शर्ती शासनाने प्रशासकीय मान्यता देताना लागू केल्या असून निर्णयात नमूद केल्या आहेत. इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा, संचालक यांनी शासनास सादर करावे, असे शासनाने निर्णयात नमूद केले आहे . (वार्ताहर)