शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जेवणावळीच्या पायघड्यांचा पुनश्च प्रत्यय

By admin | Updated: March 28, 2017 00:56 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू आहे.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू असून, साहित्य क्षेत्रातून याबाबत आश्चर्य व्यक्तकेले जात आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात एका पॅनलने जेवणावळी घातल्यानंतर दुसऱ्या अन्य पॅनलनेही त्यांची बरोबरी करत जेवणावळी घालून आम्हीही प्रचारात मागे नाही हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ज्यांनी त्यावेळी ‘डिनर डिप्लोमसी’चा डांगोरा पिटला त्यांच्याकडूनच जेवणावळीचा असा घाट घातल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या जेवणावळीचे फोटो सोशल माध्यमातून फिरल्याने जेवणावळीचा प्रकार समोर आला होता, ही बाब लक्षात ठेवत ‘डिनर डिप्लोमसी’ म्हणवणाऱ्यांनी आपल्या जेवणावळी रात्री उशिरापर्यंत या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता निर्विघ्न पार पाडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच सावानाच्या निवडणुका रंग घेऊ लागल्याने मत मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा कौशल्याचा कोणाला कितपत फायदा होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)धर्मादाय आयुक्तांकडे वर्ग केलेल्या खटल्याचा युक्तिवाद दोन्ही गटांकडून सोमवारी (दि. २७) पूर्ण करण्यात आला. एक दा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नसल्याने आता बुधवारी (दि. २९) किंवा गुरुवारी (दि. ३०) या प्रकरणाची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत या प्रकरणी निकाल देण्याचे आदेश दिलेले असल्याने धर्मादाय आयुक्तयाप्रकरणी काय निकाल देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.‘त्या’ फलकाचा ‘अनोखा प्रवास’रेडक्रॉस सिग्नल परिसरात एका पॅनलकडून भला मोठा प्रचाराचा फलक उभारण्यात आला आहे. याच फलकावरून प्रचारातील वादाची पहिली ठिणगी पडली होती. फलक लावण्यासाठी या पॅनलकडून मनपातर्फे रितसर परवानगी घेण्यात आली असली तरी रविवारी (दि. २६) फलक लावण्याची मुदत संपुष्टात आली आहे. मुदत संपूनही हा फलक तेथेच असल्याने संबंधित पॅनलनेही हा फलक उतरवून घेण्याचे सौजन्य दाखविले नाही आणि मनपा प्रशासनाकडूनही याबाबत काणाडोळा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.