शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बंडखोर भाजपा नगरसेवकांना समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:19 IST

महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेत शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत बंड पुकारणाºया सत्ताधारी भाजपाच्या ‘त्या’ चार सदस्यांना पक्षाने समज देत असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिल्याचे समजते. भाजपा गटनेत्यांनीही सदरचा प्रकार गैरसमजुतीने झाल्याचे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे.

नाशिक : महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेत शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत बंड पुकारणाºया सत्ताधारी भाजपाच्या ‘त्या’ चार सदस्यांना पक्षाने समज देत असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिल्याचे समजते. भाजपा गटनेत्यांनीही सदरचा प्रकार गैरसमजुतीने झाल्याचे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे.स्थायी समितीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यात सत्ताधारी भाजपातील मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांचा समावेश होता. त्यामुळे स्थायी समितीतील भाजपा सदस्यांमधील संघर्ष उफाळून आला होता. सत्ताधारी पक्षातीलच सदस्यांनी आपल्या सभापतींविरुद्ध बंड पुकारल्याने विरोधकांना आणखी बळ मिळाले.मात्र, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नियमानुसारच कामकाज करण्याचा पवित्रा घेत विरोध करणारेच अनेक ठरावांना सूचक-अनुमोदक असल्याचे सांगत बंडखोरांची हवा काढून घेतली होती. स्थायीतील या संघर्षाचीच बुधवारी महापालिका वर्तुळात चर्चा होती. स्थायीतील भाजपा सदस्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या कृतीची गंभीर दखल पक्षाने घेतली. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी चारही सदस्यांना तातडीने पाचारण केल्याचे समजते. त्यातील जगदीश पाटील हे बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नसल्याचेही सांगण्यात आले.