शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

By admin | Updated: April 14, 2016 23:40 IST

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

नांदगाव : कायदा धाब्यावर बसवून नदीपात्रातच वीटभट्ट्या नांदगाव : तालुक्यातील जलस्त्रोतांची क्षमतेच्या नीचांकाकडे वाटचाल सुरू असताना व पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती नजीकच्या काळात येऊ घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शासनाचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात असलेल्या अवैध वीटभट्ट्यांना पाणी कसे मिळते आणि दिवसेंदिवस गावाकडे सरकणाऱ्या या भट्ट्यांना महसूल विभागाचे संरक्षण कसे मिळते? याचे उत्तर प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी देतील का? जमिनींच्या नावांमधले फेरफार व बेकायदेशीर प्रकरणांची माहिती अधूनमधून चव्हाट्यावर येत असताना मूग गिळून बसलेले प्रशासन वीटभट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा का गप्प आहे. काही वर्षे आधी नांदेश्वरी देवीलगत सरकलेल्या भट्ट्या तत्कालीन प्रशासनाने हटविल्या. पण वर्ष दोन वर्षात त्या पुन्हा गावाकडे सरकल्या. त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संशयाची सुई त्यामुळे फिरत असते. पाणी बचतीचे महत्त्व शिरपूर पॅटर्नमधून कळाले असले व शासन स्तरावर त्याचा डंका पिटला जात असला तरी नांदगावची महसूल यंत्रणा जणू काही घडलेले नाही अशा आविर्भावात या प्रकाराकडे बघत आहे. नदीचे वाळवंट बनलेल्या नांदगावच्या शाकांबरी व तिच्या उपनदीचे नदीपात्र जणू पैसे कमविण्याचे कुरण बनले आहे. अतिक्रमणांमुळे नांदगाव मधील नद्यांची अवस्था तर जवळजवळ गटारांसारखी झाली आहे. तालुक्याच्या प्रशासनाचा गाडा गेल्या काही महिन्यात लुळापांगळा झाल्याचा बोलबाला आहे. पाऊस पडत नाही म्हणून नदीपात्रांची वाट लावत त्याकडे संवेदनाहीन नजरेने बघायचे. नोव्हेंबर २००९ मध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या शहाराची भीषण अवस्था करून ठेवली होती. त्याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुनील गाढे यांनी नदीपात्रांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर काही काळ लोटत नाही तोच पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने नदीपात्र गिळंकृत करण्याचा झपाटा सुरु जाला. तो इतका की आता ऐन नदीपात्राच्या मध्यभागातच अतिक्रमणांचे बस्तान थाटले आहे.हे कमी पडते की काय म्हणून, आता ...नदीपात्राच्या मध्यातच रोजरोस वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यांना असे परवाने देताना गौणखनिज कायद्याच्या कोणत्या नियमान्वये त्या दिल्या. याचा खुलासा तहसीलदार अनिल गवांदे यांना देता आला नाही. वीटभट्ट्यांमधून सल्फर डायआॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनाक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायुंमुळे होणारे डोळ्यांचे विविध विकार, श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग हे कॉमन आहेत. वीटभट्ट्यांमुळे हवेतल्या कार्बनचे प्रमाण वाढून परिसरातील तपमानात वाढ होते. त्याचा परिणाम शेती व आरोग्यावर होत असतो. मात्र सब कुछ चलता है चा नारा महसूल विभाग किती बेफिकीरीने देत असतो व सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो याचे नांदगाव मधील उपरोल्लिखित उदाहरण एक ‘आदर्श’ उदाहरण ठरले तर वावागे वाटू नये. बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र नांदगावच्या महसूल यंत्रणा या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहात नसल्याकारणाने बिनबोभाटपणे सगळीकडे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरु होत आहेत. (वार्ताहर)