शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अ‍ॅप्सवर मुकणेचे वास्तव

By admin | Updated: October 19, 2015 23:17 IST

प्रश्नांची उत्तरे : आता स्थायी समितीच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत शहराला मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसंबंधी उपस्थित झालेले विविध प्रश्न आणि त्याबाबतची उपस्थिती प्रशासनाने महापालिकेच्या अ‍ॅप्सवर मांडली असून, आजवर राबविलेल्या निविदाप्रक्रियेचे समर्थन केले आहे. मुकणे पाणीयोजनेतील अडसर महासभेने दूर केल्यानंतर आता निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीवर ठेवण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रशासन आणि स्थायी समिती यांच्यात ताणलेले संबंध पाहता मुकणे पाणीयोजनेबाबत समिती काय भूमिका घेते याकडे आता लक्ष लागून राहणार आहे.शनिवारी (दि.१७) झालेल्या महासभेत तब्बल २२ महिन्यांपासून रखडलेल्या मुकणे पाणीयोजनेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. सेना-भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी मुकणे पाणीयोजनेबाबत उपस्थित केलेल्या विविध तांत्रिक मुद्यांमुळे प्रस्ताव रखडला होता. मात्र, सत्ताधारी मनसेसह राष्ट्रवादी, कॉँग्रेस, माकपा व अपक्षांनी केवळ वाढीव खर्चाच्या दायित्वाचा मुद्दा उपस्थित करत योजनेचे समर्थन केले. महासभेने सदर निविदाप्रक्रियेला आणि वाढीव खर्चाला मान्यता दिल्यानंतर प्रशासनाने या योजनेबाबत नागरिकांमध्येही काही संभ्रम राहू नये यासाठी पालिकेने विकसित केलेल्या स्मार्ट नाशिक अ‍ॅप्सवर आजवर उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रामुख्याने, इपीसी कंत्राट का काढले गेले, निविदाप्रक्रिया राबविण्याची मनपाला घाई का झाली, प्री क्वॉलिफिकेशन निकष ठेवून निविदा मागविण्याची गरज का भासली, पाइप स्पेसिफिकेशनमध्ये बदल का करण्यात आले, शंका उपस्थित होऊनही निविदाप्रक्रिया का सुरू ठेवली, तांत्रिक मूल्यांकनातील तफावत, निविदा बयाणा बॅँक गॅरंटी स्वरूपात घेणे आदि प्रश्नांचा उहापोह करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरे देताना महापालिकेने संपूर्ण निविदाप्रक्रिया कशी पारदर्शकपणे आणि तांत्रिकदृष्ट्या कशी योग्य होती, याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, महासभेच्या मान्यतेनंतर आता मुकणेची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीवर ठेवण्यात येणार असून, स्थायी समिती नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)