शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

By admin | Updated: October 5, 2016 23:41 IST

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

नाशिक : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक्स’द्वारे दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले़ त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असून, सागरी सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे़ तसेच फोर्स वन, एटीएस, एटीसी, क्यूआरटी व आरसीपी जवान राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ११४ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ राज्याच्या सीमा सुरक्षिततेच्या मुद्द्यावर माथूर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार व पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षिततेबाबत गंभीर आहे़ मुंबईमधील सागरी सुरक्षिततेसाठी पोलीस दलास ७० नवीन बोटी मिळाल्या असून, याठिकाणी फोर्स वनचे कमांडो तैनात आहेत़ तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्यूआरटी, आरसीएफ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत़ या तिन्ही विभागातील जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली आणखी काही शस्त्रे व साहित्य विकत घेण्याची प्रक्रि या येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे़ मुंबईतील सागरी तळांच्या सुरक्षिततेसाठी चार नवीन सागरी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे़ एनएसजी, बीएसएफ व गुप्तचर यंत्रणांसोबत नियमित बैठका सुरू असून, चांगला समन्वय साधला जात आहे़ राज्यांतर्गत सुरक्षेसाठी विभागीय बैठका तर सीमा व सागरी सुरक्षेबाबत आठ दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे राज्यस्तरीय बैठक झाली होती़ राज्यातील दहशतवादी कारवाई वा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी दहशतवादविरोधी पथक तसेच पोलीस ठाणे स्तरावर असलेल्या एटीसी विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ पोलिसांच्या नेटवर्किंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली असून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतर्क असल्याचे माथूर यांनी सांगितले़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणीपोलिसांवरील कामाचा वाढता ताण त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याची समस्या कमी व्हाव्यात यासाठी दरवर्षी पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ तसेच आजारपणातील तपासणी अहवालाचे जतन केले जाईल़ कामावरील ताण कमी करण्यासाठी वर्षभरातून एकदा सहकुटुंब सहलीसाठी सुटी दिली जाईल़ या सुटीसाठीचा खर्च पूर्वी पोलीस कुटुंब कल्याण मंडळातर्फे केला जात होता तो आता सरकारने करावा, अशी मागणी केली जाणार आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंब सहलींसाठी औरंगाबाद, पुण्यासह विविध ठिकाणावरील ‘हॉलिडे होम’ येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहेत़