शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीसाठी पुन्हा सरसावली कृती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:15 IST

गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या डीपीरोडच्या विस्तारीकरणात बाधीत होत असलेली झाडे महापालिकेने हटवावीत, तसेच भोसला स्कूलच्या बाजूने असलेल्या जागेचे भूसंपादन करून रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी गंगापूर रस्ता विकास कृती समितीने केली आहे.

नाशिक : गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या डीपीरोडच्या विस्तारीकरणात बाधीत होत असलेली झाडे महापालिकेने हटवावीत, तसेच भोसला स्कूलच्या बाजूने असलेल्या जागेचे भूसंपादन करून रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी गंगापूर रस्ता विकास कृती समितीने केली आहे.  गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतच्या रस्त्यावरील वृक्षतोडीचा विषय प्रचंड गाजला होता. वृक्षतोडीच्या विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण असल्याने त्यावरून बरीच भवतीनभवती झाली होती. अखेरीस न्यायालयाने अटी-शर्तींच्या आधारे हा विषय मार्गी लागला आणि काही झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार काही प्रमाणात झाडे तोडून काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी न्यायालयाच्या अटीनुसार महापालिकेने दहा झाडे लावली आहेत. तथापि, याच शंभर मीटर डीपीवरील बाधीत झाडे तोडण्याचे बाकी आहे. त्यामुळे ही झाडे त्वरित हटवावीत, अशी मागणी समितीने केली आहे.  विशेषत: भोसला स्कूल गेटसमोर, नवश्या गणपतीरोड म्हणजेच वागस्कर बंगल्याजवळ, पोतदार हाउस कंपाउंड, गणेश मार्बलजवळ अशा विविध ठिकाणी असलेले वृक्ष तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबर जेहान सर्कल ते श्री गुरुजी रुग्णालयाच्या दरम्यान शंभर मीटर डीपीरोडलगत दक्षिण बाजूला भोसला स्कूल आहे. त्याच्या आत महापालिकेने सीमांकन केले आहे.  सदरची जागा संपादित करून रस्ता रुंदीकरण करावे तसेच गंगापूरराडवर कॉलेजरोड, गंगापूररोड, मॉडेल कॉलनी, भोसला मिलिटरी स्कूल या दरम्यानचा विकास आराखड्यात दर्शविलेला रस्ता तयार करावा, आनंदवली पाइपलाइनरोड, नक्षत्र लॉन्स पुढील डीपीरोड विस्डम हाय ते सिरीन मेडोजपर्यंत पूर्ण करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.  समितीचे के. जी. मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असून, यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना जनता दरबारात निवेदनही दिले जाणार आहे.