शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समिती बैठकीत अधिकाऱ्यांची पुन्हा परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:42 IST

नाशिक : गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेचे ...

ठळक मुद्देयंत्रणेची धावपळ : कामांचा घेणार लेखाजोगा

नाशिक : गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेचे पितळ उघडे पाडल्यानंतर दहा दिवसांच्या कालावधीत यंत्रणेने काय काम केले याचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, त्यासाठी मंगळवारी (दि. २८) पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीचा निरोप गुरुवारी सायंकाळी मिळताच शासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून, गेल्या दहा दिवसांतखाते प्रमुखांनी काय कार्यवाही केली याची माहिती मागविण्यात आली आहे.त्यानुसार येत्या मंगळवारी ही बैठक बोलाविण्यात आली असून, नियोजन अधिकाºयांनी आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाकडून माहिती मागविली आहे. त्यात त्यांनी खर्चाची तुलनात्मक माहिती मागविली असून, सन २०१४-१५ आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यात किती खर्च झाला त्याची माहिती सादर करण्याबरोबरच, चालू वर्षी खर्च कमी होण्याची कारणे काय अशी विचारणा केली आहे. निधी खर्च व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती विचारण्यात आली असून, गेल्या दहा दिवसांत केलेल्या कामांचा तुलनात्मक बदलाचा तक्ताही मागविण्यात आला आहे. कमी खर्च करणाºया विभागाच्या अधिकाºयांविरुद्ध केलेल्या कारवाईचा तपशील, ३१ मार्चपर्यंत खर्च जलदगतीने व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील अधिकाºयांकडून मागविण्यात आला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा निरोप मिळताच शासकीय अधिकाºयांची धावपळ उडाली असून, गेल्या दहा दिवसांत अधिकाºयांनी निधी खर्चाबाबत काय कार्यवाही केली याचा जाब विचारला जाणार असल्याने अनेकांना धडकी भरली आहे.पालकमंत्र्यांकडून झाडाझडतीजिल्ह्णाच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केलेली असतानाही त्यातील जेमतेमच रक्कम खर्च करण्यात आल्याची बाब पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आल्याने त्यांनी अधिकाºयांची झाडाझडती घेत चांगलेच सुनावले होते. जिल्हा नियोजन समितीबरोबरच जिल्हा परिषद, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाने त्यांच्यासाठी केलेली तरतूद खर्च न केल्याने भुजबळ यांनी दहा दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याची सूचना देऊन पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर केले होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी