यावेळी उपसरपंच पदासाठी विहीत मुदतीत रवींद्र बोरसे याचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. बोरसे यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनिल गांगुर्डे यांची स्वाक्षरी आहे. रवींद्र बोरसे यांच्या पत्नी सोनाली बोरसे यांनीही दोन वर्षांपूर्वी उपसरपंच म्हणून कामकाज बघितले आहे. उपसरपंच निवडणुकीनंतर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष ॲड. संजय पवार यांनी उपसरपंच रवींद्र बोरसे यांचा सत्कार केला, तर अंगणवाडी सेविकांनी उपसरपंचांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना मास्कचे वाटप केले. याप्रसंगी जयवंत पवार, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, जि. व्ही. पवार, बाळू पवार, गजेंद्र पवार, परशुराम पवार, अभिजित पवार, मनोहर पवार, गोपाळराव बोरसे, नंदकुमार बोरसे, आदींसह उपस्थित होते.
मानूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र बोरसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST