शिरगाव : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित अकरावी राज्य सबज्युनिअर अजिंक्यपद टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर झाली. यात पुरुष गटाने उपविजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या संघाने सलग नऊ स्पर्धा जिंकून उपविजेतेपद पटकावले. जळगाव जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्यात अंतिम सामन्यात एक धावेने पराभव पत्करावा लागला. सर्वाधिक धावा करणारा राजापूरचा ओंकार यादव हा मालिकावीर ठरला.जिल्हा संघात ताऱ्या महमद, मौल महमद, अयाज खालीफ, अल्ताफ पाटणकर, सचिन धोपटे, मयुरेश मांडवकर, विनायक मसये, नीलेश माध्ये, स्वप्नील कुवलेकर, ओंकार यादव, अपेक्षित उरणकर, संकेत चव्हाण, प्रणित वावरे, सामी महमद तर प्रशिक्षक निनाद शिर्सेेकर, अभिलाष यादव, महमद देसाई यांनी योगदान दिले.मुलींच्या संघात अनायदा शेखनाग, श्रद्धा सावंत, श्रद्धा खेतले, निकिता वारके, अनुष्का गडदे, निकिता कदम, विजेत्या संघाला नाशिक क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा भारतीचे अध्यक्ष हरिष गुप्ता, राज्य संघटनेचे सचिव महमद बाबर, उपाध्यक्ष धोत्रे व जिल्हा संघटना सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष मिलिंद विखारे व २३ जिल्हा संघटनेच्या सचिवांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. या संघात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्ह्यातील चार मुले व एका मुलीची निवड पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली. या स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा अध्यक्ष रमेश कदम व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)रत्नागिरीच्या संघाने सलग ९ स्पर्धा जिंकत पटकावले उपविजेतेपद.अंतिम सामन्यात जळगाव संघाकडून केवळ एका धावेने पराभव.राजापूरचा ओंकार यादव ठरला मालिकावीर.जिल्ह्यातील पाचजणांची पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीचा जिल्हा संघ उपविजेता
By admin | Updated: November 17, 2014 23:25 IST