अवघे बालपण दारिद्र्यात भाजून निघत असले, तरी प्रेम व्यक्त करायला कोठे पैसे लागतात? रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी रविवारी रस्त्यावर रक्षाबंधन साजरे करीत जणू हेच दाखवून दिले. बहिणीच्या हाती औक्षणाचे ताट नाही, की भावाला बसायला पाट नाही. नवे कपडे तर नाहीच नाही. होता तो फक्त मायेचा ओलावा.. आधीच्या सगळ्या गोष्टींवर मात करणारा !
पनवेलमध्ये रेशनिंग धान्याचा अपहार
By admin | Updated: August 10, 2014 23:59 IST