शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांचा संप मागे

By admin | Updated: August 9, 2016 00:55 IST

रेशन दुकानदारांचा संप मागे

 नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून राज्यव्यापी संपात सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांनी सोमवारी अचानक संप मागे घेत, धान्य उचलण्यासाठी चलने भरली तर काहींनी दुकानेही सुरू करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण केले.रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदारांच्या संघटनेने १ आॅगस्टपासून राज्यव्यापी संप पुकारला असताना दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नदी, नालेकाठावरील शेकडो कुटुंबे बाधित झाली. अनेकांचे संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून रेशनवरील शिधा उपलब्ध करून देण्यासाठी रेशन दुकानदारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यासाठी पुरवठा अधिकारी व उपआयुक्तांनी बैठकाही घेतल्या, परंतु रेशन दुकानदारांनी संपावर राहण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यामुळे पुरवठा खात्याने सर्व दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर रेशन दुकानदारांनी नांगी टाकत दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. शहरातील दुकानदारांनी ही तयारी दर्शविलेली असताना, त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुकानदारांनीही स्वत: संप मागे घेत, चलने भरली. सोमवारी पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या तीन तालुक्यातील दुकानदार वगळता सुमारे ७११ दुकानदारांनी चलने भरली, तर शहरातीलही १३७ दुकानदार माल उचलण्यास राजी झाले. त्यामुळे सकाळी ज्यांनी चलने भरली, त्यांनी दुपारी धान्य घेत दुकानेही उघडी करून वितरण सुरू केले. (प्रतिनिधी)