शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आदिवासी भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:10 IST

नाशिक : जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून आदिवासी समाजातील सर्व भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका वितरित कराव्यात, तसेच खावटी योजनेमार्फत त्वरित धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विभागमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यलयात आदिवासी विभागाच्या आढावा बैठक.

नाशिक : जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून आदिवासी समाजातील सर्व भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका वितरित कराव्यात, तसेच खावटी योजनेमार्फत त्वरित धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विभागमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यलयात आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीत पाडवी बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कातकरी, भिल्ल तसेच समाजातील गरजू लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी खावटी योजनेच्या माध्यमातून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात यावे. त्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून या मोहिमेंतर्गत लाभार्थींना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच शिधापत्रिकेपासून जे वंचित कुटुंब आहेत त्यांचे विभक्तीकरण करून त्यांनाही शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.आदिवासी बालकांच्या कुपोषणाची समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पीक नागली व भगर यावर प्रक्रिया करून बालकांच्या आहारात त्याचा समावेश करण्यात यावा. यासाठी सुरुवातीला काही बालकांना आहार देण्यात यावा व या माध्यमातून होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करून तसा अहवाल आदिवासी विभागाला सादर करण्यात यावा यासाठी अंगणवाडी-सेविका व मुख्य सेविकांची मदत घेण्यात यावी, असेही पाडवी यांनी सांगितले. सहायक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी यावेळी कोरोनाच्या काळातील आदिवासी विभागाची माहिती देताना एक हजार ८३१ कुटुंबांना ज्यामध्ये रेशनकार्ड नसलेले अनुसूचित जमातीचे कुटुंब, कातकरी, विधवा महिला, अपंग लाभार्थी यांना दोन हजार ४२४ क्विंटल धान्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.यावेळी आमदार डॉ. नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठाअधिकारी अरविंद नरसीकर, अप्पर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर आदी उपस्थित होते.आदिवासींसाठी४६२ कोटींची तरतूदराज्यातील ११ लाख ५५ हजार गरजू आदिवासी कुटुंबांना खावटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्यासाठी ४६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी खावटीची रक्कम आदिवासींकडून परत घेतली जात होती; परंतु यंदा कोरोनामुळे आदिवासींना परतफेड करण्याची गरज राहणार नाही, असे सांगून, सरकारची मदत थेट गरजूंना व्हावी यासाठी थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार असल्याचे पाडवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयK. C. Padaviके. सी. पाडवी