शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार कार्डधारकांना रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:17 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धान्याच्या कोट्यात कपात करण्याऐवजी नवीन लाभार्थींना त्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सुमारे २० हजार पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध सुरू झाला आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धान्याच्या कोट्यात कपात करण्याऐवजी नवीन लाभार्थींना त्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सुमारे २० हजार पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध सुरू झाला आहे.  केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करून ग्रामीण भागात ३९ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या तर शहरी भागात ६४ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला शिधापत्रिकेवर रेशनमधून दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरी, शहरी भागात मात्र वार्षिक उत्पन्नाच्या निकषात शिधापत्रिकाधारकांना पात्र ठरविण्यासाठी पुरवठा खात्याला कसरत करावी लागली होती. मात्र केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने त्यावेळी अधिकाऱ्यांनी शिधापत्रिकाधारक पात्र ठरविले; परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात भेदाभेद झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या उद्दिष्टाइतकेच शिधापत्रिकाधारक पात्र ठरविण्याची सक्ती असल्याने एकाच ठिकाणी व समान वार्षिक उत्पन्न असलेल्या अनेकांना डावलले गेल्याने सरकारविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर सरकारने पुन्हा उद्दिष्ट वाढवून दिले असले तरी, त्यातून सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळू शकलेला  नाही.  आता मात्र एप्रिल महिन्यापासून सरकारने रेशनच्या धान्य वाटपासाठी पॉस यंत्राची सक्ती केल्याने जे रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी येतील त्यांनाच धान्य वितरित केले जात आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सुमारे २० ते २२ टक्के शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठीच आले नाहीत.वीस हजार लाभार्थी शक्यपुरवठा खात्याने तहसीलदारांना तशा सूचना दिल्या असून, मात्र या योजनेचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या अटीत बसणाºयांनाच यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे, तसे जिल्ह्यात २० हजार लाभार्थी असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय