चांदवड- तालुक्यातील मनमाड मालेगाव रोडवर कानडगाव पाणपोई फाट्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी मोर्चाचे आयोजन धनगर समाजाचे नेते मच्छिंद्र बिडगर, साईनाथ गिडगे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम मार्कंड व धनगर समाज बांधवांनी केले. तर या रास्ता रोको मध्ये चक्क धनगर बांधवांनी मेंढरे आणून ती रस्त्यावर उभी केली होती.तर पिवळे ध्वज घेऊन आपल्या न्याय मागण्या केल्या यावेळी तहसीलदार डॉ. शरद मंडलिक , पोलीस निरीक्षक संजय पाटील , उपनिरीक्षक कैलास चौधरी यांना मागण्याचे निवेदन दिले त्यात म्हटले आहे की,धनगर समाजास एस.टी. चे आरक्षण अंमलबजावणी त्वरीत करणे,मेंढपाळावर फॉरेस्ट विभागाने खोटे गुन्हे दाखल केलेले मागे घेणे, धनगर समाजास मेंढपाळांना बंदुकीचे लायसन्स मिळावे,अहमदनगरचे नामांतरण अहिल्यादेवीनगर असे व्हावे, सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी विद्यापीठ नामकरण व्हावे या मागण्याचा समावेश आहे. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
कानडगावला सकल धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:37 IST
चांदवड- तालुक्यातील मनमाड मालेगाव रोडवर कानडगाव पाणपोई फाट्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी मोर्चाचे आयोजन धनगर समाजाचे नेते मच्छिंद्र बिडगर, साईनाथ गिडगे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम मार्कंड व धनगर समाज बांधवांनी केले. तर या रास्ता रोको मध्ये चक्क धनगर बांधवांनी मेंढरे आणून ती रस्त्यावर उभी केली होती.
कानडगावला सकल धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको
ठळक मुद्देसकल धनगर समाजाच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.