नाशिक : राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी विविध शाळांमध्ये उपाययोजना सुरू असून, रासबिहारी शाळेतदेखील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसाठी वह्या- पुस्तके ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या लॉकर्सचे उद्घाटन सोमवारी (दि.३०) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी थोरात यांनी रासबिहारी शाळेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजनेची प्रशंसा केली. शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त वह्या-पुस्तके आणावी लागणार नाहीत अशा पद्धतीने शाळेतील तासिकांचे नियोजन या शाळेत करण्यात आले आहे. शासन हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असते, तसेच शासनाच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल, असे मत शाळेचे विश्वस्त श्रीरंग सारडा यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास करण्यासाठीच फक्त वही घरी नेता येणार आहे आणि इतर वह्या-पुस्तके मात्र शाळेच्या लॉकर्समध्येच ठेवली जाणार आहेत.
रासबिहारी’ विद्यार्थी होणार दप्तरमुक्त
By admin | Updated: December 3, 2015 23:48 IST