शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:14 IST

नांदूरवैद्य : राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवऱ्हे कौटी फाटा येथे विनामास्क व विनाकारण बाहेर फिरत असलेल्या नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात ...

नांदूरवैद्य : राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवऱ्हे कौटी फाटा येथे विनामास्क व विनाकारण बाहेर फिरत असलेल्या नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली असून पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोरपगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याचे वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. माळी यांनी सांगितले.

नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरून विनाकारण बाहेर पडत असलेल्या व्यक्तींवर वाडीवऱ्हे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. प्रवासाचा पास असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. महामार्गावरून विनाकारण भटकत असल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासह कोविड अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यास तातडीने इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासह ही मोहीम सुरू केली आहे.

-----------------------

पथकाकडून मोहीम

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वैध कारण असेल अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीचा ई-पास काढला असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडणे आवश्यक आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश अहिरे, राजेंद्र कचरे, पोलीस हवालदार भाऊसाहेब भगत, पोलीस शिपाई सोमनाथ बोराडे, होमगार्ड त्र्यंबक, पेठ पथक यांच्याकडून कार्यवाही केली जात आहे.