शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साक्ष फिरविल्यास बलात्कार पीडितेकडून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:26 IST

अत्याचारित महिलांचे पुनवर्सन करणाºया ‘मनोधैर्य’ योजनेत राज्य शासनाने नव्याने सुधारणा करून अत्याचारग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत दहा लाखांपर्यंतची मदत जाहीर केली असली तरी, अशा मदतीचा लाभ घेणाºया अत्याचारित महिलेकडून न्यायालयात साक्ष फिरविली गेल्यास तिला दिलेल्या मदतीची वसुली करण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. अत्याचार करणाºयाविरुद्ध अत्याचारपीडितांनी ठाम रहावे, या मागचा शासनाचा हेतू आहे.

नाशिक : अत्याचारित महिलांचे पुनवर्सन करणाºया ‘मनोधैर्य’ योजनेत राज्य शासनाने नव्याने सुधारणा करून अत्याचारग्रस्तांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत दहा लाखांपर्यंतची मदत जाहीर केली असली तरी, अशा मदतीचा लाभ घेणाºया अत्याचारित महिलेकडून न्यायालयात साक्ष फिरविली गेल्यास तिला दिलेल्या मदतीची वसुली करण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. अत्याचार करणाºयाविरुद्ध अत्याचारपीडितांनी ठाम रहावे, या मागचा शासनाचा हेतू आहे.आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेत विद्यमान भाजपाच्या सरकारने दुरुस्त्या करीत नवीन आदेश जारी केले आहेत. त्यात लैंगिक अत्याचाराला बळी पडणाºया महिला, तरुणी, बालकांना संरक्षण प्रदान करण्यात आले असून, अत्याचारितांना एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळण्याची त्यात तरतूद आहे. शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने बलात्कार व बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्याचाराला बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना सुरू केली होती व राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी केली. परंतु या योजनेंतर्गत अत्याचारग्रस्तांना शासनाकडून भरघोस आर्थिक भरपाई मिळत असल्याचे पाहून काही महिलांनी पुरुषांशी संगनमत करून खोटे दावे दाखल करण्याचे व त्याआधारे शासनाकडून भरपाई मिळवण्याचे प्रकार घडल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. जेणेकरून तोपर्यंत सदर महिलेने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन दोषीला शिक्षा झालेली असेल व शासनाने दिलेली भरपाईदेखील सत्कारणी लागलेली असेल. अर्थात अशा खटल्याचा निकाल अगोदर लागला तरीदेखील महिलेला नुकसानभरपाईची रक्कम दहा वर्षांच्या मुदतीनंतरच मिळणार आहे. अशा प्रकारची मदत देताना शासनाने पोलीस अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला व बालविकास खात्याचा अहवाल या साºया गोष्टींची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. प्रत्यक्षात न्यायालयात खटला सुरू झाल्यावर संबंधित महिलांनी खोटी साक्ष दिल्याच्या तसेच साक्ष फिरविल्यामुळे अत्याचार करणाºयांची पुराव्याअभावी सुटका झाल्याने या योजनेतील त्रुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुधारित नवीन योजना तयार केली व त्यात प्रामुख्याने अत्याचारग्रस्त महिलांना प्रारंभी फक्त २५ टक्के रक्कम रोख स्वरूपात देण्याची व उर्वरित ७५ टक्के रक्कम दहा वर्षांसाठी मुदतठेव म्हणून बॅँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.