शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ संबंध जाहीर न करण्यासाठी खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:45 IST

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाºया महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : एका समाजातील चार दाम्पत्यांपैकी दोन दाम्पत्यांमधील अनैतिक संबंधाच्या संशयावरून केलेल्या कॉल रेकॉर्डिंगच्या सीडी तयार करण्यासाठी खर्च झालेले दोन लाख तीन हजार रुपये न दिल्यास सदर रेकॉर्डिंग हे समाजातील जात पंचायत तसेच मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाºया महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरात एकाच समाजातील पाच मित्रांची अनेक वर्षांपासून मैत्री असून त्यांचे सहपरिवार एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे़ या पाच मित्रांपैकी संजय व सुशीलची पत्नी मीना यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयची पत्नी शालू (नावे बदलली आहेत़) हीस होता़ त्यामुळे शालूने या अनैतिक संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ शालूने जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत संजय व मीना यांचे मोबाइलवरील अनैतिक संबंधांचे पुरावे असलेले संभाषण रेकॉर्ड करून त्याच्या सीडी तयार केल्या़ या सीडीसाठी शालूला दोन लाख तीस हजार रुपये खर्च आला व तिने या खर्चाची मागणी सुशीलकडे केली़ मात्र हे पैसे देण्यास सुशीलने नकार दिल्याने संजय व मीना यांच्या अनैतिक संबंधांच्या संभाषणाच्या सीडी समाजातील जात पंचायत तसेच सुशीलच्या मुलीच्या शाळेत पसरवून बदनामी करण्याची धमकी शालूने दिली़ या प्रकारामुळे सुशील याने मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून शालूच्या विरोधात खंडणी तसेच बदनामीची फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एच़ एच़ शेजवळ करीत आहेत़