शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: January 13, 2017 01:33 IST

छबू नागरेच्या पत्नीवर खंडणीचा गुन्हा

नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरे सध्या तुरुंगात आहे. त्याच्या पत्नीने एका इसमाला कर्जाची रक्कम वसुलीकरिता जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित प्रीती छबू नागरे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रीती नागरे ही मायक्रो फायनान्सची व्यवस्थापक असून, या फायनान्सकडून फिर्यादी विशाल सुरेश दिंडे (३२, रा. गंजमाळ) याने एक लाख ८७ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी एक लाखाची परतफेड केली असून, उर्वरित रक्कमेच्या वसुलीसाठी नागरे हिने दिंडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत सज्जड दम भरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिंडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून छबू नागरेची पत्नी प्रितीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, प्रितीचा शोध घेतला जात आहे. दिंडे यांनाही प्रितीचा पत्ता माहीत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. दिंडे यांच्याशी प्रितीने साधलेला अर्वाच्य भाषेतील संवादाची ध्वनीफित सर्वत्र व्हायरल झाली असून, ही ध्वनीफित पोलिसांनी मिळविली आहे. ध्वनिफितमध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने नागरे हिने संवाद साधला असून, दिंडेकडून क र्जाची रक्कम वसुलीसाठी धमकावल्याचे लक्षात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सदर गुन्ह्णाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे करीत आहेत. कर्जापोटी जरी रक्कम दिली असेल तर ती वसूल करताना कुठल्याही प्रकारे संबंधित कर्जदाराची छळवणूक न करता त्याच्याकडून रक्कम घेणे कायद्याच्या दृष्टीने अपेक्षित आहे. उसनवार दिलेली कर्जाची रक्कम घेताना संबंधितांने जर दमदाटी व संबंधिताला धमकाविण्याचा प्रयत्न केला तर ती कायद्याने खंडणी वसुली म्हणून ग्राह्ण धरली जाते, अशी माहिती तांबे यांनी दिली आहे. याप्रकरणी लवकरच संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले जाणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.