शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

शाळा प्रवेशासाठी रात्रीच लागल्या रांगा

By admin | Updated: December 29, 2015 00:01 IST

शाळा प्रवेशासाठी रात्रीच लागल्या रांगा

नाशिकरोड : बोचऱ्या कडाक्याच्या थंडीत रविवारी रात्री असंख्य पालक, महिलांनी जेलरोड येथील सेंट फिलोमिना शाळेबाहेर आपल्या पाल्याचा केजीच्या वर्गाचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून नियमात बसणाऱ्या व निर्धारित वेळेत येणाऱ्या सर्व पालकांना प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिलेले असताना सुद्धा पालकांनी प्रवेश अर्जासाठी रात्रीच रांग लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेलरोड येथील सेंट फिलोमिना शाळेत ज्युनिअर केजी वर्गाच्या तीन तुकड्या असून, त्यामध्ये १८० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. काही वर्षांपूर्वी शाळेकडून जितक्या जागा आहे तितकेच अर्ज वाटप केले जात होते. त्यामुळे पालक प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी आदल्या रात्रीच रांगा लावत होते. याचा फायदा घेत काही जणांनी रांगेत नंबर लावण्यासाठी प्रवेश अर्ज किंवा प्रवेश मिळवून देण्याचा ‘धंदाच’ मांडला होता. कडाक्याच्या थंडीत पालकवर्गाला रात्रभर उघड्यावर पाल्याच्या प्रवेश अर्जासाठी रांगा लावण्याचा व त्यातून होणारा गैरप्रकार लक्षात घेऊन शाळा प्रशासनाकडून नियमानुसार व निर्धारित वेळेत येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात करून देण्यात आली. तरीही लागली रांगसेंट फिलोमिना शाळेत ज्युनिअर केजीच्या वर्गात आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यासाठी सोमवारी प्रवेश अर्ज वाटप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जून मध्ये ज्या पाल्याला चार वर्षे पूर्ण होतील त्यांना सर्वांना प्रवेश अर्ज देण्यात आले. तरीदेखील रविवारी सायंकाळनंतर पाल्याचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी काही पालकांनी उपस्थिती दर्शविली होती. सदर माहिती पाल्याचा शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित पालकवर्गाला समजताच एकेक करत असंख्य पालक, महिलांनी रविवारी रात्रीच रांग लावण्यास सुरुवात केली. याचवेळी कोणीतरी एक वही आणून रांगेत ज्या क्रमांकाने उभे आहेत त्या क्रमांकाने नावे लिहिण्यास सुरुवात केली. रात्री जवळपास २५०-३०० पालकांनी प्रवेश अर्जासाठी रांग लावली होती. कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पालकांनी शेकोट्या पेटवून, मोबाइलवर गेम खेळत, गाणे-चित्रपट बघत एकमेकांचा आधार बनत गप्पागोष्टी करीत संपूर्ण रात्र जागून काढत सोमवारी सकाळी शाळेत प्रवेश अर्ज वाटपास सुरुवात झाल्यानंतर रांगेत जाऊन प्रवेश अर्ज मिळविले. (प्रतिनिधी)