शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी गौळाणे रस्त्यावर परवानगीशिवाय रंगला विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

इंदिरानगर : नाशिक शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप विवाह सोहळ्यांना ...

इंदिरानगर : नाशिक शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, अशा परिस्थितीत पाथर्डी - गौळाणे रस्त्यालगत असलेल्या एसएसके क्लबमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे व महापालिका प्रशासनातर्फे क्लब चालकावर वीस हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. तसेच राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्येही विवाह सोहळ्यांवर बंधने घालण्यात आली होती. सध्या शहरातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी राज्य सरकारचे लॉकडाऊनचे नियम लागू आहेत. त्यामुळे शहर व जिल्ह्यात विवाह सोहळ्यांवरील निर्बंध कायम आहेत. विवाह सोहळ्यांमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक हजेरी लावत असून मास्क न वापरणे व सुरक्षित अंतर न ठेवणे यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने त्यामुळे विवाह समारंभाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही शुक्रवारी (दि. ४) रोजी दुपारी दीड वाजता पोलीस नियंत्रण कक्षातून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गौळाणे रस्त्यालगत एस एस के क्लबमध्ये विवाह समारंभ सुरू आहे, असे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी क्लबमध्ये विवाह समारंभ होऊन जेवणावळ चालू होती. पोलीस आणि मनपाच्या पथकाला याठिकाणी सुमारे ४५ ते ५० लोक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित क्लब चालकाला दंडात्मक कारवाई म्हणून वीस हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.