शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कलात्मक लघुपटांनी रंगला महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:36 IST

चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत  कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला. भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. या महोत्सवात राज्यभरातील एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देऔचित्य : फाळके, पेंढारकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

नाशिक : चंदेरी दुनियेचे संस्थापक चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने चित्रपटसृष्टीत अढळपद मिळवलेल्या फाळके आणि पेंढारकर या कलावंतांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत  कलातीर्थ लघुपट महोत्सव रंगला.भारतीय चित्रसाधना आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ लघुपट महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. या महोत्सवात राज्यभरातील एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके तसेच तिला संजीवनी प्रदान करणाऱ्या भालजी पेंढारकर या दोन्ही श्रेष्ठ चित्रपटतपस्वींचे योगदान सर्वश्रुत आहे. त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न कलातीर्थच्या वतीने करण्यात आल्याचे जयदीप पवार यांनी सांगितले. महोत्सवाच्या आयोजनासाठी  कलातीर्थचे शौनक गायधनी, सुमंत वैद्य, जयदीप पवार, अभिषेक पिंगळे, महेश चौधरी, तेजस बिल्दीकर, तेजस देव, स्वरदा लगड कुलकर्णी, पुष्कर पाडेकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, अवंती रत्नपारखी, पराग लेले यांनी विशेष परिश्रम घेतले. n भालजी पेंढारकर यांचे नातू भरत दैनी आणि नात सई पेंढारकर-सपकाळे यांच्या हस्ते दादासाहेब फाळके यांची नात स्वाती फाळके-काळे, वासंती फाळके, पणती गिरिजा फाळके- मराठे यांना सन्मानित करण्यात आले. फाळके यांच्या १५०व्या जयंतीच्या औचित्याने करण्यात आलेल्या या सत्कारास रसिक प्रेक्षकांनीदेखील भरभरून दाद दिली. फाळके यांच्या कर्मभूमीत त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा सन्मान झाल्याबद्दल  फाळके कुटुंबीयांनी समाधान  व्यक्त केले. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक