शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानाविरोधात रणरागिणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:42 IST

रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले.

वडाळागाव / इंदिरानगर : रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले.वडाळा-डीजीपीनगर क्रमांक एक या रस्त्यावर खोडेनगरच्या परिसरात असलेल्या ‘रुंग्टा कॅसल’ सोसायटीच्या महिला सोमवारी (दि.१०) रस्त्यावर उतरल्या. शेकडोच्या संख्येने महिलांनी दारू दुकानापुढे एकत्र येत ‘दारू दुकान बंद करा, बंद करा’, ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले.या सोसायटीमध्येच रस्त्याच्या दिशेने ‘कर्मा रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’ तसेच ‘के-९ बियर अ‍ॅण्ड वाइन शॉपी’ ही मद्यविक्रीची दुकाने आहेत ‘बार हटवा, परिसर वाचवा’, ‘दारू दुकानदाराचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘दारू दुकान बंद करा, मुलांचे भविष्य वाचवा’ अशा घोषवाक्यांचे फलक झळकवत या सोसायटीसह परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत ठिय्या दिला.दरम्यान, बार या आंदोलनाच्या भीतीमुळे बंद जरी असले तरी शेजारी बियर-वाइन विक्रीच्या दुकानामधून आंदोलना दरम्यान मद्यविक्री केली जात असल्याने महिला अधिक आक्रमक झाल्या. दरम्यान, महिलांनी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.मध्यरात्रीपर्यंत येथील दुकानांमधून सर्रासपणे मद्यविक्री केली जाते तसेच मद्यपींकडून रात्री धिंगाणा घालत शिवीगाळ करतात. त्यामुळे घरांमधील लहान मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो. तसेच घरात राहणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली. यावर प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. या आंदोलनात सोसायटीमधील शाळकरी मुलेदेखील सहभागी झाली होती.‘दारूबंदी’च्या घोषणाअन् मद्यविक्री सुरूच दारु दुकान बंद करण्याच्या घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात असतानाच दुसरीकडे वाइन शॉपीमधून सर्रासपणे मद्यविक्री सुरू होती. यावेळी कुठल्याहीप्रकारे रहिवाशांच्या आंदोलनाची दखल संबंधित विक्रेत्याने घेतली नसल्याचे दिसून आले. दारू विक्रीचा जरी परवाना असला तरी सर्वनियमांची पायमल्ली करण्याचा परवाना विक्रेत्यांना दिला कोणी? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रहिवासी भागातील दारूविक्री थांबवावी, या मागणीसाठी नगरसेवकांपासून तर थेट आमदारांपर्यंत आणि पोलीस ठाण्यापासून आयुक्त कार्यालयापर्यंत निवेदनांचा पाऊस पाडला; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे महिलांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग