शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावीचा राणा गजानन

By admin | Updated: February 19, 2017 00:10 IST

पारंपरिक पद्धतीने साजरा झाला गजानन महाराज प्रगटदिन सोहळा

नाशिक : अनंतकोटी ब्रह्मांड नायक । महाराजाधिराज योगीराज । परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतीपालक । शेगाव निवासी समर्थ सद्गुरू । श्री संत गजानन महाराज की जय ।।, ‘जय गजानन माउली’, ‘गण गण गणात बोते’ या आणि अशा जयघोषात शनिवारी (दि. १८) गजानन महाराज प्रगटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील गजानन महाराजांच्या विविध मंदिरांत प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटेपासूनच अभिषेक, काकडा भजन, आरती, गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, भागवत कथा, पाद्यपूजा, रुद्राभिषेक यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरांमध्ये दुपारी तर काही मंदिरांमध्ये संध्याकाळी भव्य पालखी सोहळ्यानंतर गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विदर्भ कॉलनी येथेही गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात सकाळी रुद्राभिषेक, रामदास शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन तर दुपारी महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विदर्भ कॉलनीतील मंदिरात संध्याकाळी साडेपाच वाजता पालखी मिरवणूक, तर दुपारी १२ वाजता गजानन महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  पंचवटी, उपेंद्रनगर, इंदिरानगर, वनवैभव, प्रशांतनगर पाथर्डी फाटा, पाटीलनगर त्रिमूर्ती चौक, वृंदावननगर म्हसरूळ, नाशिकरोड आदि गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये प्रगट दिन सोहळा पारंपरिक पद्धतीने तसेच भक्तिमय वातावरणात पार पडला. संध्याकाळी सात वाजता आरती आणि रात्री ८ वाजता भजन सेवेने प्रगटदिन सोहळ्याची सांगता झाली.