शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रामसृष्टी उद्यानाची झाली दुरवस्था

By admin | Updated: September 20, 2015 23:07 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

नाशिक : साधुग्राममध्ये साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम सुरू असताना तपोवनातील रामसृष्टीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने या उद्यानाला अवकळा आली आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र घाण निर्माण झाली आहे. तपोवनातील एक आकर्षक उद्यान म्हणून खरे तर या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. सिंहस्थ काळात हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करणे गरजेचे होते. परंतु या ठिकाणी सिंहस्थ काळात अनेक भिकाऱ्यांचे वास्तव्य होते. काही पर्यटकही या ठिकाणी मुक्कामी राहिले. याच ठिकाणच्या जवळपास प्रातर्विधी केला जात असल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी आजही कायम आहे. उद्यानाच्या समोरील जागेत साठलेले मातीचे ढीग आणि झाडेझुडपे वाढल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि उष्टे अन्न टाकण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तर दुर्गंधीत अधिकच भर पडली आहे. नदीच्या एका कोपऱ्याला उद्यान असल्याने या उद्यानाची पुरेशी देखभाल केली जात नसल्यामुळे या ठिकाणी नेहमीच गैरप्रकार चालतात. कुंभमेळ्यात गर्दीमुळे प्रेमीयुगुलांचा वावर कमी झाला असला तरी, सध्या भिकाऱ्यांनी या उद्यानाचा ताबा घेतलेला आहे. या उद्यानात सर्वत्र घाण आणि कचरा साचला आहे. सध्या पावसामुळे याठिकाणी चिखल झाला असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी अगोदरच पडून असलेला कचरा कुजल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानाच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, कित्येक दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नसल्याने आता दुर्गंधी सुटली आहे. या परिसराकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)