शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावसह परिसरात रामनामाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:10 IST

‘श्रीराम, जय राम, जय जय राम’ नामाचा गजरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर परिसरात दोन राम मंदिरे आहेत. सावता चौकातील राम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

संगमेश्वर : ‘श्रीराम, जय राम, जय जय राम’ नामाचा गजरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर परिसरात दोन राम मंदिरे आहेत. सावता चौकातील राम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.  दुपारी १२ वाजता भजन, भक्तिगीतांनी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. परिसरातील आबालवृद्ध भाविकांची रांगा लावून दर्शन घेतले. भाविकांनी पुष्पहार अर्पण करून राम-सीतेच्या मूर्तींची मनोभावे पूजा केली. भाविकांनी रामनामाचा गजर केला. मंदिराच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंगलमय वातावरणात भाविकांनी महाआरती केली. मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. फुलाच्या माळांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. सावता महाराज मंदिराचे विश्वस्त, भाविक, नागरिकांची उपस्थिती होती.  रामसेतूनजीकच्या राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा झाला. रामनवमीनिमित्त गुढीपाडव्यापासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात अखिलेश महाराज यांनी रोज दुपारी ३ ते ६ यावेळेत श्रीराम कथा सादर केली. कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती चांगली होती. राष्टÑीय एकात्मता समितीच्या वतीने राम जन्मोत्सवानिमित्त मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.  मनमाड चौफुलीनजीक नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात रामप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजा, अभिषेक, आरती करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आला. नगरसेवक राजाराम जाधव, संजय जाधव, किशोर जाधव, राजेंद्र चौधरी आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संगमेश्वरातील नवीन होळी चौकातील त्रिशूळ मंडळाच्या वतीने इच्छामणी गणेश मंदिर परिसरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संजय कैचे, सदानंद सूर्यवंशी, नाना देवरे, पंकज अमृतकर, अतुल कैचे आदींसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.परशरामनगरात प्रवचनासह आरतीकलेक्टरपट्टा : येथील परशरामनगर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. भाविकांनी मंदिराची सजावट करुन श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भजन, आरती केली. यानिमित्त हरिदास महाराज यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी केदा महाराज, जगन्नाथ महाराज, बाळासाहेब सैंदाणे, वामन महाराज बच्छाव, उत्तम चव्हाण, काशीनाथ महाराज, विक्रम गढरी, बापू बच्छाव, सुमनबाई बच्छाव, शशिकला पवार, मंजुळा आहिरे, पुष्पा सैंदाणे, हिराबाई केदार, सुरेश पवार, दगा बच्छाव, बाळू देसाई, अंबादास चौधरी, निर्मला बच्छाव, निर्मला सावकार आदी उपस्थित होते. अभिषेक करून हनुमानाचे पूजनवाके : येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे श्रीराम मंदिरात मूर्तींना अभिषेक करुन हनुमानचे विधिवत पूजन करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात रामायणातील विविध प्रसंगांचे वर्णन करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने राम जन्मोत्सवानिमित्त पाळणा पुष्पांनी सजवण्यात आला होता. या पाळण्यात रामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. दुपारी १२ वाजता पाळण्याला झोका देऊन राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यांनतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

टॅग्स :Ram Navamiराम नवमी