शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युतीत जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:43 IST

नाशिक : २०१४च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर देशात मोदी यांना, तर राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले; परंतु २०१९च्या निवडणुकीला सामोरे जाताना सेना-भाजपाने रिपाइंला एकही जागा न सोडल्याचे दु:ख आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना भेटणार : एनडीए मात्र सोडणार नाही

नाशिक : २०१४च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर देशात मोदी यांना, तर राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले; परंतु २०१९च्या निवडणुकीला सामोरे जाताना सेना-भाजपाने रिपाइंला एकही जागा न सोडल्याचे दु:ख आहे. युती करताना आमचा अनुल्लेखदेखील टाळला जाणार असेल तर निवडणुकीत चांगले दृश्य दिसणार नाही. अशी नाराजी एकीकडे व्यक्त करीत असताना दुसरीकडे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत एनडीए सोडणार नाही. रिपाइंला दोन जागा मिळाव्यात यासाठी पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.नाशिक जिल्हा दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी, सेना व भाजपाने प्रत्येकी एकेक जागा लोकसभा निवडणुकीसाठी सोडल्यास यापुढे राज्यसभेची जागा आपण मागणार नाही असे सांगून, रिपाइं ज्या पक्षांच्या सोबत असतो तो पक्ष सत्तेवर येत असतो हे आजवर स्पष्ट झाले आहे, याची जाणीव सर्व पक्षांना असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याला निरोप पाठविला होता. परंतु आपण वेगळा काही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कोणतेही राजकारण नसले तरी, मध्यंतरीच्या काळात देशातील वातावरण काहीसे वेगळे होते, परंतु आता सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे देशातील वातावरण बदलले असून, तरुण वर्ग भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे सांगून, आठवले यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी दहा टक्क्याने वाढ करावी व त्यात भटके विमुक्तांना सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे लष्करात दलित समाजासाठी स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणीही केली. सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी आपणच मागणी केली होती व सरकारने ती मान्य करून लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील ते नाकारू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. दलितांना घटनेने आरक्षण मिळत गेल्यामुळे ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता त्यांच्याकडून दलितांवर अत्याचार केला जात होता. आता सर्वच घटकांना आरक्षण मिळणार असल्यामुळे दलितांवर अत्याचार होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.