शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रामघाटावर साकारतेय चित्ररूपी रामायण

By admin | Updated: August 9, 2015 23:04 IST

पहिलाच प्रयोग : वॉटरप्रूफ अ‍ॅक्रॅलिक रंगात रंगणार गोदाघाट

नाशिक : श्रीरामाच्या वास्तव्याचे दाखले असणाऱ्या नाशिकमध्ये सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांसमोर संपूर्ण रामायण चित्ररूपात साकारण्याचे शिवधनुष्य नाशिकच्या कला परिवाराने उचलले असून, १५० व्यक्तिरेखांचा समावेश असलेले हे महाचित्र बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या अमरधामपासून ते कन्नमवार पुलापर्यंतच्या घाटाजवळ बांधलेल्या भिंतीवर रामायणाचे हे महाचित्र साकारले जात आहे. ९५० फूट लांब भिंतीवर सुमारे २० फूट उंच आकारात हे महाचित्र रंगविण्यास सुरुवात झाली आहे. कला परिवारातील पाच सदस्य यासाठी कष्ट घेत असून, शुक्रवारपासून सुरू झालेले हे चित्र किमान १० दिवस काम केल्यानंतर पूर्ण होऊ शकणार आहे. संपूर्ण रामायणात असलेल्या प्रसंगांचे चित्र यात साकारण्यात येणार आहे. त्यात रामजन्मापासून ते रावणदहन अशी सुमारे ३० प्रसंगे चित्रित करण्याचा कलावंतांचा प्रयत्न आहे. शासनाच्या जलसंपदा विभाग आणि प्रख्यात चहाविक्रेती कंपनी यांच्या सहकार्यातून महाकाव्याचे महाचित्र साकारले जात असून, त्यासाठी किमान ३०० लिटर रंग वापरले जाणार आहेत. हे सर्व रंग डोळ्यांना आल्हाददायक असे असतील आणि पावसाच्या तसेच पुराच्या पाण्याचा त्यावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने ते वापरण्याचा प्रयत्न असल्याचे कला परिवाराच्या सदस्यांनी सांगितले. आत्तापर्यंत १०० लिटर रंगांचा वापर झाला असून, सायंकाळपर्यंत हनुमानाची सूर्याकडे झेप, रामजन्म, सीतास्वयंवर यांसारखी काही प्रसंगांची चित्रे पूर्ण झाली होती. अजूनही रावणदहनापर्यंतची विविध चित्रे येत्या दहा दिवसांत पूर्ण करणार असल्याचे कलावंतांनी सांगितले.