शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जिल्ह्यात ठिकठिकाणी रामरथाची मिरवणूक

By admin | Updated: April 7, 2017 01:07 IST

नाशिक : जिल्ह्यात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 नाशिक : जिल्ह्यात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.पिंपळगाव बसवंत : येथील सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या रामरथाची मिरवणूक जल्लोषात पार पडली. सियावर रामचंद्र की जय, पवनसूत हनुमान की जय अशा घोषणा देण्यात आल्या. आकर्षक रोषणाई व फुलांनी सजविलेल्या रामरथाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता ढोल-ताशा व वाजंत्रीच्या गजरात काढण्यात आली. आदिवासी नृत्य व फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीस प्रारंभ झाला. सकाळी कावड मिरवणूक, दुपारी बारा वाजता रामजन्म व सायंकाळी रामरथाची मिरवणूक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत चालू होती. शहरातील सर्व चौकात रामरथाचे पूजन झाले. रथमार्गावर आकर्षक रांगोल्या काढण्यात आल्या होत्या. निफाड फाटा येथे रामरथ येताच रामजीकी निकली सवारी या गाण्यावर सर्वांनीच ठेका धरला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांवर आरोप करणारे या ठेक्यावर एकमेकांवर गुलालाची उधळण करत ठेका धरताना दिसत होते. धर्मजागरण समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे याकामी सहकार्य लाभले.उमराणेत शोभायात्राउमराणे : येथे रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसाद वाटप व भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उमराणे येथे पुरातन श्रीराम मंदिर असून, यावर्षी श्रीराम नवमीनिमित्त या मंदिरात गेल्या आठवड्यात श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, त्यानिमित्त रामेश्वर भजनी मंडळातर्फे या मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन सजविलेल्या अश्वरथातून श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या सजीव देखाव्यासह श्रीराम यांच्या प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अंबादास मांडवडे, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सूर्याभाई राजपुरोहित, भूषण महाले, संदीप देवरे, मोहन महाले, उमेश देवरे, प्रवीण देवरे, पप्पू शिरसाठ, मयूर शिरसाठ, सुनील देवरे, पांडू देवरे, गणेश पगारे आदिंसह बहुसंख्य श्रीरामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते.यात्रेनिमित्त जोरणला कुस्त्या जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे सालाबादप्रमाणे भव्य कुस्ती दंगल ठेवण्यात येते. तसेच श्रीराम नवमीनिमित्त यात्रोत्सवही भरविण्यात येतो.जोरण येथील सर्व गावामार्फत कुस्ती दंगलीचे नियोजन करण्यात येते व कसमादे परिसरातील सर्व मल्ल कुस्ती दंगलमध्ये सहभाग नोंदवतात. यावेळी विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून जोरण येथील सुभाष क्षत्रिय यांनी काम पाहिले. यावेळी सुभाष सावकार, महादू सावकार, सुकदेव सावकार, रमेश गणू सावकार, मुरलीधर सावकार, दिगंबर देवरे, बापू बेडीस, नंदकिशोर सावकार, बाबाजी सावकार, भिला सावकार, केदा सावकार, कडू सावकार, पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस हवालदार आर. के. काटकर, सागर चौधरी, नवनाथ पवार यांनी काम पाहिले. (लोकमत ब्युरो)