शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदचे आज नमाजपठण

By admin | Updated: June 25, 2017 22:45 IST

वडाळागावातील काही प्रत्यक्षदर्शींनी चंद्र बघितल्याची ग्वाही जुने नाशिकमधील शाही मशिदीत धर्मगुरूंच्या बैठकीत दिली.

नाशिक : रमजान पर्वच्या ३० तारखेच्या संध्येला रविवारी (दि.२५) शहरातील काही उपनगरांमध्ये ढगाळ हवामान काही वेळ कमी झाल्यामुळे चंद्रदर्शन घडले. वडाळागावातील काही प्रत्यक्षदर्शींनी चंद्र बघितल्याची ग्वाही जुने नाशिकमधील शाही मशिदीत धर्मगुरूंच्या बैठकीत दिली. त्यानंतर रमजान ईदच्या सामूहिक नमाजपठण सोमवारी (दि.२६) शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता होणार असल्याची घोषणा करण्यात आली.इस्लामी कालगणनेच्या नववा उर्दू महिना रमजानची रविवारी संध्याकाळी ३० तारीख होती. त्यामुळे चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. शहरासह जिल्ह्यातील चांदवड, येवला आदि भागांमध्येही चंद्रदर्शन घडल्याची माहिती विभागीय चांद समितीला प्राप्त झाली. तसेच काही वेळेतच वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि उपनगरांमध्येही चंद्रदर्शन घडल्याची खात्रिशीर माहिती समजल्यानंतर संबंधित प्रत्यक्षदर्शींची माहिती घेऊन त्यांना तत्काळ मशिदीमध्ये सुरू असलेल्या बैठकीसाठी बोलविण्यात आले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना महेबूब आलम, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, मौलाना मुफ्ती आसीफ इकबाल यांच्या उपस्थितीत वडाळागावातील प्रत्यक्ष चंद्रदर्शन घेतलेले हाफीज अब्दुल मजीद, मौलाना इरफान रजा, कारी अझीम खान, अल्तमश शेख आदिंनी चंद्रदर्शन स्पष्टपणे बघितल्याची ग्वाही दिली. तसेच नोंदवहीमध्ये चंद्रदर्शनाच्या मजकुरापुढे स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर सय्यद हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थित धर्मगुरू व खतीब यांच्या परवानगीने अधिकृतरीत्या चंद्रदर्शनाची ग्वाही प्राप्त झाल्याचे जाहीर केले. उपस्थित सर्व समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तत्काळ शाही मशिदीच्या मुख्य ध्वनिक्षेपकावरून चंद्रदर्शन घडल्याची माहिती देत रमजान ईदचे सामूहिक नमाजपठण सकाळी १० वाजता शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.