शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चंद्रदर्शन घडल्याने  आज रमजान ईद; सर्वत्र उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:18 IST

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे.

नाशिक : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे.  शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी तत्काळ शाही मशिदीमधून चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला. रमजान पर्वाचा प्रारंभ आणि सांगता शुक्रवारीच झाली. बहुतांश मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना केली.‘चांद मुबारक’च्या शुभेच्छाशुक्रवारी संध्याकाळी समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संध्याकाळी जुने नाशिक परिसरातील चौक मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा आदी परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बाजार फुलला होता. सुकामेवा, नवीन कपडे, पादत्राणे, मेहंदी, अत्तर, टोपी, सुरमा आदींना मागणी वाढली होती.ईदगाह सज्जनमाजपठणाच्या सोहळ्यासाठी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडताच ईदगाहचे दोन्ही प्रवेशद्वार पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. मैदानाचा ताबा पोलिसांकडून घेण्यात आला होता. मैदानाचे सपाटीकरण करून दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम