शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईद : मुस्लीम बांधवांचे सामुहिकरित्या नमाजपठण

By admin | Updated: June 26, 2017 13:21 IST

भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला.

नाशिक : भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. हजारो समाजबांधव यावेळी रमजान ईदच्या नमाजपठणासाठी उपस्थित होते. पारंपरिक पध्दतीने उपस्थितांनी सामुहिकरित्या विशेष नमाज अदा केली.रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्त्वामध्ये शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी नमाजपठण केले. सकाळी ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये काही वेळ चिंतेचे वातावरण होते; मात्र क्षणार्धातच ढगाळ हवामान दूर होऊन सुर्यप्रकाश पडल्याने ईदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्याबाबत असलेली चिंता दूर झाली. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिक मैदानाच्या दिशेने येण्यास सुरूवात झाली होती. तासाभरात संपुर्ण मैदान तुडूंब भरले. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये अबालवृध्द यावेळी मैदानात जमले होते. नमाजपठणासाठी एकापाठोपाठ एक रांगा करण्यात आल्या होत्या.

 दरम्यान, ईदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थितांना ‘ईद’ व ‘ईदगाह’चे महत्त्व पटवून दिले. तसेच धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीवरही त्यांनी आपल्या खास शैलीत प्रकाशझोत टाकला. यावेळी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-काजी मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना शाकीर रजा, मौलाना महेबुब आलम आदि मान्यवर उपस्थित होते.दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थितांना विशेष नमाजपठणाच्या पध्दतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पध्दतीने नमाज पूर्ण केली.