शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्या साजरी होणार रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

_____ नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (दि. १४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या ...

_____

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) येत्या शुक्रवारी (दि. १४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा शहर ए खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धर्मगुरूंच्या विभागीय बैठकीत बुधवारी संध्याकाळी करण्यात आली.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ईदवर सावट आहे. यामुळे या वर्षीही शहरातील शहाजहाँनी ईदगाह मैदानावर सामुदायिकरीत्या नमाजपठणाचा सोहळा होणार नसल्याचे खतीब यांनी बोलताना स्पष्ट केले. यामुळे ईदगाह यंदाही सुने-सुने राहणार आहे. समाजबांधवांनी आपापल्या घरात ईदचे नमाजपठण करावे, असे आवाहन सर्व धर्मगुरूंनी केले आहे.

रमजान ईद, बकरी ईद हे दोन प्रमुख सण मुस्लीम बांधवांचे सर्वांत मोठे सण म्हणून ओळखले जातात. या सणाच्या दिवशी धार्मिक परंपरेनुसार नमाजपठण केले जाते. ‘शिरखुर्मा’ हे रमजान ईदचे विशेष आकर्षण असते. हे खाद्यपदार्थ दुधापासून तयार केलेले सुकामेव्याचे द्रवरूप मिश्रण असते.

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी कोरोनाची साथ तेजीत असून, संसर्ग शहरासह ग्रामीण भागातसुद्धा अधिक फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिनाभरापासून सर्व धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली आहेत. येत्या बुधवारपासून नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. यामुळे यंदा समाजबांधवांना ईदची नमाज आपापल्या घरांमध्येच पठण करावी लागणार असल्याचे दिसते.

________

कोरोनाचे संकट बघता समाजबांधवांनी या वर्षीही ईदची खरेदी पुढे ढकलली आहे. बाजारपेठा बंद असल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंसाठी राबणाऱ्या विविध संस्थांचे हात बळकट करण्यासाठी समाजबांधव प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. महिनाभरापासून कोरोनाची तीव्र झालेली साथ, रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता ‘जकात’, ‘फित्रा’च्या माध्यमातून समाजातील धनिक वर्ग गोरगरीब कुटुंबांपर्यंत आर्थिक स्वरूपात दान तसेच धान्यदान पोहोच करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांश सामाजिक सेवाभावी संस्थांनी अशा कुटुंबांचा शोध घेत ‘रमजान किट’ अर्थात शिरखुर्मासाठी लागणारा सुकामेवा, किराणा वस्तू पुरविण्यास सुरुवात केली आहे.