शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:24 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : अन्याय बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.तहसीलदार महेंद्र पवार मोर्चाला सामोरे गेले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी आदींच्या उपस्थितीत उद्धव रोंगटे, स्वप्नील धांडे, जालिंदर घिगे यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनावर कविता कौले, जयश्री भोये, तुळसा आचारी, सोनाली पवार, अर्चना बर्डे , फशी ढोरे, सपना भरसट, यशोधा खोडे आदी विद्यार्थिनींच्या स्वाक्षºया आहेत. यावेळी तहसीलदारांनी मी आजच वरिष्ठांना आपल्या मागण्यांबाबत कळवितो, असे अश्वासन दिले. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर चक्रे फिरली. आणि काही वेळातच सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयातून विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना येत्या २६ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे.अशा आहेत मागण्यात्र्यंबकेश्वर येथील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहास शासकीय इमारत मिळाली पाहिजे.त्र्यंबकेश्वर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी.त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल चौधरी यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी.दि.११ नोव्हेंबर २०११ च्या शासकीय निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी.