शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राळेगणसिद्धीला तिहेरी मुकूट

By admin | Updated: August 8, 2014 00:23 IST

पारनेर : तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत राळेगणसिद्धीच्या मुलांच्या संघांने जेतेपद पटकावले़

पारनेर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित पारनेर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय विद्यालयातील मुलांच्या संघांने चौदा, सतरा, एकोणीस या तीनही वयोगटात जेतेपद पटकावले़ या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़पारनेर तालुका क्रीडा संकुलावर बुधवारी व गुरूवारी झालेल्या या स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक नाईक, दादा शेटे, माजी उपसरपंच चंद्रकांत कावरे, आर. डी. औटी व महेंद्र मगर यांच्या हस्ते झाले. राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय विद्यालयातील चौदा वर्षे वयोगटातील तेजस मगर, गणेश कुंभार, ऋतिक मापारी, महेश दरेकर, शुभंम पठारे, प्रसाद गायकवाड, आदेश आहेर, ऋषीकेश गोपाळे, तुषार शेटे, राज कामठे, जयराज गोरे, गणेश सांळुके, स्वप्नील टकले यांनी उत्कृष्ट खेळ करून पारनेर, निघोज, वडझिरे संघाना पराभूत केले. वडझिरे येथील जनसेवा विद्यालयाचे दिपक एरंडे, सहादु फुलमाळी, सुयश एरंडे, किरणे आबाणे, सुजीत थोरात, देवेंद्र घोरपडे, तेजस औटी, चेतन फंड, राहुल फुलमाळी यांनी जोरदार झुंज दिली.सतरा वर्षे वयोगटात संत निळोबाराय विद्यालयाच्या आकाश आदमाने, सुहास नलगे, प्रकाश गवळी, धवलश्री दुश्मन, सौरभ घेनंद, सागर निंबाळकर, स्वप्नील वाळुंज, निखील खेडेकर, आदीत्य बनकर, निलेश वांढेकर यांनी जोरदार खेळ करीत पारनेर न्यू इंग्लीश स्कूलवर मात करीत विजय मिळवला.न्यू इंग्लीश स्कूलच्या राहुल पवार, स्वप्नील दाभाडे, सुरज कानगुडे, राहुल गायकवाड, अक्षय आंग्रे, सचिन रणदिवे, नितीन खाडे, मच्छींद्र जाधव, दिपक बागुल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकोणीस वर्षे वयोगटातही राळेगणसिद्धीच्या संघाने निघोजच्या मुलीका देवी विद्यालय संघाचा पराभव केला. राळेगणसिद्धीचे क्रीडा मार्गदर्शक सोमनाथ वाकचौरे, भाऊसाहेब धावडे, संतोष बर्डे यांच्या कामगिरीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुक केले. यावेळी क्रीडा समितीचे तालुकाध्यक्ष बापुराव होळकर, बाळासाहेब मते, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब रांधवण, शाहुराव औटी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)