नाशिक : झेप सामाजिक संस्था व यशस्विनी सामाजिक अभियानच्या वतीने नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी झेप सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता निमसे यांनी बंदीजनांना शुभेच्छा देतानाच चांगल्या वर्तवणुकीने शिक्षा कमी होऊन लवकर कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रयत्न कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. बंदिवानांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर समाजाने तिरस्कार न करता चांगल्या पध्दतीने चांगल्या विचारांनी स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कारागृहाचे अधिकारी तसेच मंगला माळी, संजीवनी म्हैसफुके, पुष्पा राठोड, संगीता सानप, मंगला गांगुर्डे, मीरा शिंगोटे, कल्पना पाटील, कलावती काळे, रोशनी भामरे, आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सण साजरा
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST