शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भावाच्या नात्याचे रक्षाबंधन उत्साहात

By admin | Updated: August 11, 2014 00:51 IST

बहीण-भावाच्या नात्याचे रक्षाबंधन उत्साहात

सिन्नर : शहर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये आदि ठिकाणी रक्षाबंधन सण उत्साहात पार पडला. रक्षाबंधन रविवारी सुटीच्याच दिवशी आल्याने आदल्या दिवशीच हा सण साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सण व संस्कृतीची जपवणूक होतानाच विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, बंधुत्वाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने हा सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधन असो की भाऊबीज या बहीण- भावाच्या नात्याची गुंफण अधिक बळकट करणाऱ्या उत्सव मुलांना चांगल्या पध्दतीने समजावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले विद्यालययेथील सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सण सामूहिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक आर. जी. सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुमंत गुजराथी, डॉ. मधुकर सोनवणे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख टी. एस. ढोली यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास वंदे मातरम् संघटनेचे डॉ. महावीर खिंवसरा, मनोज भंडारी, पराग शहा, किरण गवळी, संतोष जाधव, मुन्ना बनसोडे, संजय विशे, बाजीराव बोडके, अरुण सोनवणे, रवींद्र मालपाठक, नारायण इंगळे, दत्तात्रय काळे आदि उपस्थित होते.वडांगळीयेथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळा मंगलमय व देशभक्तीपर वातावरणात पडला.यावेळी सतीश कांदळकर (पंजाबमधील वाघा बॉर्डर), मंगेश खुळे (कंधार), महेश चव्हाणके ( जामनगर), योगेशे खुळे (जामनगर) उज्ज्वल शेलार (अनंतनाग) या जवानाचा विद्यालयाच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त प्राचार्य शरद रत्नाकर, गुलाब सैयद यांच्या हस्ते जवानांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थिनी भगिनींनी ऋतुजा चव्हाणके, दीपाली मवाळ, पायल तांबे, सायली मवाळ, पूजा शिरसाट, पायल कुलथे, प्रजक्ता चव्हाणके, मोहिनी भुसे, विद्या चव्हाणके यांनी जवानांचे औक्षण करुन राख्या बांधल्या. शालेय गीतमंचाने संगीत शिक्षक गणेश डोकबाने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रभक्तीपर समूहगीत सादर केले. यावेळी कांतीलाल वागळे, बाबासाहेब कुलथे यांनी क्रांतिदिनाची माहिती दिली. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संचालक कृष्णाजी भगत यांच्या शुभेच्छा संदेशाची पत्रे व राख्या सीमेवर पाठविण्यात आल्या. यावेळी राजेंद्र भावसार, मिलिंद डावरे, विलास जाधव आदिंसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)