शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:11 IST

पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही.

नाशिक : पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. तर काहींच्या माहेरच्या घराचे बरेच नुकसान झाल्याने तिथे अजूनही घरांची साफसफाई आणि डागडुजीच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला तिकडे जाणेच शक्य न झाल्याने नेहमीप्रमाणे रक्षाबंधनाला भावाला राखी बांधता येणार नसल्याची खंत नाशिकच्या अनेक भगिनींना वाटत आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिघात आलेल्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक घरांची वाताहत तर कुणाच्या घरांची पडझड झाली. त्याशिवाय आॅगस्टच्या प्रारंभापासून त्या भागात वाहने जाणेच ठप्प झाले. तसेच टपाल खात्याने पाठवलेले पत्र, कुरिअरमार्फत पाठवलेल्या राख्यादेखील पोहोचू शकल्या नसल्याचे नाशिकमधील भगिनींनी सांगितले. त्यामुळे यंदा आम्ही केवळ मोबाइलवर बोलूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करणार असल्याची भावनादेखील कोल्हापूर किंवा सांगलीत माहेर आणि नाशिकला सासर किंवा कुटुंबासह निवास करीत असलेल्या भगिनींनी बोलून दाखवली.दरवर्षी रक्षाबंधनाला मी माहेरी जाऊन सण साजरा करते. मात्र, यंदा पुराच्या घटनेमुळे रक्षाबंधनाला माहेरी जाऊन भावाला राखी बांधता आली नाही. तसेच आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह सगळ्यांनी मिळून सण साजरा करण्याच्या आनंदालादेखील मुकले आहे. त्यांना पाठवलेली राखीदेखील पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी भावाशी मोबाइलवर बोलूनच यंदाच्या रक्षाबंधनात समाधान मानावे लागेल.- अनुराधा किरण जाधव,  कडेगावमी मूळची सांगलीची असले तरी आमचे घर पुराच्या टप्प्यापासून थोडेसे दूर होते. त्यामुळे मीच आठवडाभर सांगलीत राहून माझ्या माहेरच्या घरातून पूरग्रस्तांची सेवा केली. त्यांना आमच्या युवा मंचच्या वतीने धान्य, जेवण, कपडे पुरवण्याचे कार्य करीत होते. मात्र, आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तिकडेच राहिल्याने परवाच नाशिकला परतले. मला सख्खा भाऊ नाही. पण दरवर्षी गावातील अन्य भावांना राखी बांधते. ते यंदा शक्य नसल्याची खंत आहे.- सोनिया होळकर, सांगलीमनाची प्रचंड घालमेल सुरू आहे. अथक प्रयत्नांनंतर माझी राखी एका कुरियर कंपनीने पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, मात्र ती राखी रक्षाबंधनाला भावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचेही सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा कोल्हापूरस्थित भावाला राखी मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा होईल. आम्हा दोघी बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ आहे, मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला दोघींची राखी पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे फोनवरच भावाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहे.- पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त नाशिकपोलीस दलात असल्यामुळे मी यापूर्वी कुरियरनेच सांगलीस्थित भावाकडे राखी पाठवत असायचे. यावर्षी पूरपरिस्थितीमुळे तो पर्यायही बंद झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण हतबल आहोत, त्यामुळे भावनांना आवर घालत भावाला फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधावा लागणार आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते मानले जाते. त्यामुळे मनात कुठेतरी सल जाणवत आहे.- शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणमी मागील २८ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. दरवर्षी भावाला कुरियरद्वारे राखी पाठवत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये राहणाºया भावाकडे राखी पाठविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावताना भावनांना आवर घालण्याचा धडा मिळालेला आहे. कोल्हापूरस्थित माझ्या काही मैत्रिणींशी मी संपर्क साधला असून, त्या माझ्या वतीने राखी खरेदी करून भावापर्यंत पोहोचविणार आहे.- नम्रता देसाई,पोलीस निरीक्षक, नाशिक

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनfloodपूर