नाशिकरोड : जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधन दिनानिमित्त आर्टिलरी सेंटरमधील लष्करी जवानांना औक्षण करून राख्या बांधल्या. देशाच्या व सीमेच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी लष्करी जवानासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ड्रील मैदानावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी भदाणे, नगरसेविका हेमलता पाटील, सुनंदा जरांडे, उषा पाटील, मीराबाई निसाळ, ज्योती काथवटे, कौशल्या मुळाणे, नमिता पाटील, मुक्ता मोहिते, माधवी निसाळ, चारूलता चौधरी, अक्षरी सोनटक्के आदिंनी लेफ्टनंट कर्नल हिमांशु पांडे, सुभेदार मेजर युर्मिदास यांच्यासह शेकडो प्रशिक्षणार्थी लष्करी जवानांचे औक्षण करत राख्या बांधल्या. यावेळी कविता पाटील, वैशाली डुमरे, कीर्ती कासार, भारती बोरसे, भाग्यश्री बोरसे, प्रमिला चौरे, विद्या नवले, वंदना भदाणे, वैभवी देसले, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष दीपक भदाणे, उदय बोरसे, विशाल देसले, प्रदीप भदाणे आदि उपस्थित होते.
ये राखी बंधन है ऐसा...
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST