इगतपुरी : मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण रमजान मनमाड कुर्ला राज्यराणी एक्स्प्रेस मधील पास बोगीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोगीतील मुस्लीम बांधवांना रमजाननिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-इगतपुरी प्रवास करणारे पासधारक आसिफभाई यांना यावेळी हिंदू बांधवांनी गळाभेट करून शुभेच्छा दिल्या. आसिफभाई यांनी रमजान सणाचे महत्त्व समजावून सांगितले.बोगीतील प्रवाशांना शिरखुरमा वाटप करण्यात आला. सुशील रोकडे, हेमंत ठाणगावकर, रमेश चव्हाण, जितू मोरे, भाई जगताप, स्टेट बँक शाखाधिकारी लोटे, नितीन हाम्रे,अरुण बाविस्कर, नीलेश जाधव, संग्राम पाटील, नामदेव गोडे उपस्थित होते. दरम्यान, राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये सर्व धर्मियांचे सण उत्साहात साजरे केले जातात. प्रवाशांनी या उपक्र माचे कौतुक केले आहे.
राज्यराणी बोगीत रमजान ईद उत्साहात
By admin | Updated: July 31, 2014 00:52 IST