सिडको : गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने केलेल्या प्रचारात नाशिकमध्ये केलेल्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दाखवून नाशिक शहराचा विकास केल्याचे सांगितले होते. नााशिकची सून या नात्याने मला याचा अभिमान वाटत होता; परंतु प्रत्यक्ष असा कोणताही विकास झालेला नसून ब्ल्यू प्रिंट ही कागदावरच असल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला.भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी खासदार मुंडे बोलत होत्या.
भाजपाच्या खासदार मुंडेंकडूनही राज ठाकरेंवर टीका
By admin | Updated: February 6, 2016 23:45 IST