नाशिक : दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू असून तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेल्या कृषीविषयक कायद्यांसोबतच कामगारविरोधी कायद्यांविषयीही जनजागृती करण्याची गरज असून मुंबईत २६ जानेवारीला ध्वजारोहण झाल्यानंतर राज्यभरात या कायद्यामधील शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी ततुदींविषयी जनजागृती करण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले आहे.
नाशिक-मुंबई वाहनमार्चला सुरुवात करण्यापूर्वी किसानसभेच्या नेत्यांसह आंदोलनात सहभागी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना संबोधित करण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर सभा घेतली, यावेेळी ते बोलत होते. डॉ. अशोक ढवळे म्हणाले, केंद्र सरकारने केलेले कायदे कॉर्पोरेटधार्जिणे व शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळेच दिल्ली येथे शेतकरी निर्णायक आंदोलक करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आता संपूर्ण देशभरातील शेतकरी उभे राहिले असून आता शेतकरी, कष्टकरीविरोधात भांडवलदारांचे सरकार अशी झाली असून यात शेतकऱ्यांचाच विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, माकपचे आमदार तथा सीटूचे राज्य सचिव विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, डीवायएफआयच्या राज्य सरचिटणीस प्रीती शेखर आणि एसएफआयच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे यांनीही आंदोलकांना संबोधित केले.
इन्फो-
क्षणचित्रे -
- उत्तर महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतून नाशिकमध्ये दुपारपासून आंदोलक दाखल झाले होते. त्यांनी उन्हापासून संरक्षणासाठी वाहनांच्या सावलीलाच विश्रांती घेतली.
(आरफोटो- २३सावली)
- मुंबईकडे कूच करण्यासाठी सकाळपासून घर सोडणाऱ्या आंदोलकांनी आपली शिदोरीही सोबतच आणली होती. यातील काही आंदोलकांनी वाहनांमध्येच न्याहारी केली.
-मोर्चासाठी आंदोलक मैदनावर दाखल होत असताना अनेक तरुणांनी आपल्या मोबाइलद्वारे छायाचित्रे घेऊन आंदोलनाच्या आठवणी मोबाइलमध्ये कैद केल्या. (आरफोटो- २३ मोबाईल)
-मुंबई-नाशिक वाहनमार्चमध्ये दुचाकीस्वार आंदोलकांनीही सहभाग नोंदवला. (फोटो- ९२-९१)
- वाहनमार्चमध्ये सहभागी वाहनांची नोंदणी करून त्यांना अनुक्रम देण्यात आले. याच क्रमाने वाहने मार्गस्त झाले.
फोटो-
(१२पीएचजेएन९५) गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवले. समवेत प्रीती शेखर, मरियन ढवळे. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. डीएल करा आदी.